No icon

भडगाव प्रतिनिधी

वडजी विदयालयात कानबाई फ्रेंडस सर्कल ग्रुपचा दणकेबाज कार्यक्रम:  (कार्यक्रमाला प्रचंड गर्दी )


भडगांव : प्रतिनिधी
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २३ व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या  वाढदिवसानिमित्त वडजी येथील टी. आर. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जोपासणारा कानबाई फ्रेंड सर्कल ग्रुप धुळे शिरपूर पुणे गोल्डन बँड शिरपूर यांचा कानबाई गीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. 
सुरूवातीला विदयालयाच्या गेटपासून ढोल ताशाच्या गजरात प्रतापराव हरी पाटील आणि डॉ . पुनमताई पाटील आणि मान्यवरांचे स्वागत करून त्यांचे औक्षण करण्यात आले .या कार्यक्रमाचे निमित्ताने  प्रतिमापूजन दिपप्रज्वलन व उद्घाटन प्रतापराव हरी पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालिका डॉ. पुनमताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वडजी गावच्या सरपंच मनीषा गायकवाड , वडजी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन कैलास रामदास पाटील , अभिमन सिताराम पाटील , रामकृष्ण अभिमन पाटील ,सर्व स्कूल कमिटी सदस्य ,वडजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे , पळासखेडे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एन.पाटील , महिंदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.पी.बागुल ,संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे यासह अनेक मान्यवर  उपस्थित होते .यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .सुरुवातीला सर्वच मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कानबाईच्या गीतांचा कार्यक्रम सादर करणारे सागर देशमुख, दिलीप बाशिंगे , दिनेश बाशिंगे , कुणाल पवार , भैय्या माळी , गायिका अर्पिता कोतकर , नंदु जगताप  माऊली साऊंड सांजोरी यांचेही स्वागत करण्यात आले . यावेळी वडजी व परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच , उपसरपंच ,सर्व सदस्य , विविध कार्यकारी सहकारी सोसायटींचे , पिक संरक्षण सोसायटींचे आणि दुध डेअरींचे चेअरमन , व्हॉ . चेअरमन सर्व सदस्य ,गावातील व पंचक्रोशीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला, मुले मुली सर्वच उपस्थित होते . यानंतर कानबाई गितांचा सुमधुर कार्यक्रम सुरू झाला . सुरुवातीला गणेश वंदन मोरया मोरया आणि देवा तुझ्या दारी या गीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली . या गीतांनंतर  नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या कार्याचा परिचय दिपक भोसले यांनी करून दिला .यानंतर संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ .पुनमताई पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, शिक्षणमहर्षी प्रतापराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा प्रवाहीत ठेवून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत असताना समाजकार्यातही आपला सिंहाचा वाटा उचललेला आहे . त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे .नंतर लागलीच पुन्हा कानबाई गितांचा नजराणा जोरदारपणे सुरु झाला. यात कानबाई मतवाली गणगौरीले  नमस्कार , रथ चालना रथचालना वनी गडले ,कानबाई ऊनी व वडजी गावले ,राम आयेंगे तो कंगना सजायेंगे या गीतावर नानासाहेब प्रतापराव हरी पाटील डॉ .पूनमताई पाटील यांनी व्यासपीठावर जाऊन सर्वांना अभिवादन केले ,भाऊ मना सम्राट ,हातात बोखरी झाडू माय वसरी , गडवरली अंबाबाई ,कानबाई नी जत्रा ऊनी व माय मी घागर धरीसन नाचू व माय ,लाल लाल लुगडानी व माय तू हिरवा पदरनी , बागे बागे सपन म्हा येजो व कानबाई , दरारा दरारा नानासाहेबांचा दरारा ,सामूहिक गरबा नृत्य , तुन्हा नवस फेडसू व अंबाबाई पायरी पायरी ले लावसू मी ज्योत, पावरी नृत्य आणि शेवटी जोगवा इत्यादी सुमधुर बहारदार रंगतदार अशी कानबाईची आणि सप्तशृंगी देवीच्या गीतांची धमाकेदार मेजवानी या कलावंतांनी अतिशय सुंदररित्या सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कानबाईंच्या गीतांवरती सर्वच प्रेक्षक ,महिला ,नागरिक ,मुले मुली यांनी स्वच्छंदपणे डान्स केला. अगदी मनमुरादपणे सगळ्यांनी  कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. अक्षरशः या कानबाईच्या गीतांनी संपूर्ण परिसरात दणाणून सोडला. कार्यक्रमाला आलेल्या सर्वच प्रेक्षकांना कार्यक्रम खूपच आवडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील सर आणि दीपक भोसले सर यांनी केले. वडजी गावासह आजूबाजूच्या खेड्यातील आणि भडगावातील नागरिक आणि महिला, मुले मुली, बाल गोपाळ  यांनी कार्यक्रमाला प्रचंड अशी गर्दी केली. अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडावे असा हा सुमधुर कानबाईच्या गीतांचा कार्यक्रम आणि त्यावर प्रेक्षकांनी सादर केलेले नृत्य यामुळे अक्षरशः संपूर्ण परिसरात दणाणून उठला. शेवटी सर्वांनी कानबाई मातेला नमन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी अनमोल सहकार्य केले.

Comment As:

Comment (0)